सुषमा स्वराज चौकीदार कॅम्पेनवर पती स्वराज यांची खुसखुशीत कमेंट

sushma-swaraj
निवडणूक प्रचाराला आता रंग भरू लागला असून पक्षापक्षात घोषणा युद्ध सुरु झाले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात चौकीदार चोर है घोषणा दिल्यावर त्याला उत्तर म्हणून मोदीनी मै भी चौकीदार कॅम्पेन सुरु केले असून भाजप मधील प्रमुख नेते त्यात सामील झाले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही त्याला अपवाद नाहीत.

सुषमा स्वराज यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार असे लावून त्वित केल्याची चर्चा सुरु झाली पण त्यावर त्यांचे पती स्वराज यांनी केलेले ट्विट अधिक लोकप्रिय झाले आहे. स्वराज लिहितात, १८ मार्च ला सकाळी उठलो आणि पाहतो तो माझी पत्नी चौकीदार झालेली. स्वराज यांचे हे खासगी ट्विटर हँडल असल्याने त्याला किती लाईक आले हे समजलेले नाही मात्र त्यावर अनेक कॉमेंट होत आहेत.

यावर राहुल गांधी यांनी ट्विट करून तुम्ही कितीही दाबायचा प्रयत्न करा, तुम्ही खरे दाबू शकत नाही असे मोदींना उद्देशून लिहिले असून चौकीदार चोर है हे प्रत्येक भारतीयाला पटले आहे आणि मै भी चौकीदार साठी सुषमा यांच्यावर दबाव आलेला असू शकतो आणि ते चांगले वाटत नाही असे म्हटले आहे.

Leave a Comment