बुगाटीची बेबी कार, बच्चा खेलेगा, बच्चे का बाप भी खेलेगा

buggati1
जिनेव्हा मोटर शो मध्ये तब्बल १३३ कोटी रुपये किमतीची जगातील सर्वाधिक महागडी कार सादर केल्यानंतर बुगाटी ने स्वस्त कारही सादर केली आहे. बुगाटी कार्सच्या किमती कोट्यावधी रुपये असतात त्यातुलनेत ही कार फक्त ३४ हजार डॉलर्स म्हणजे २५ लाख रुपयात मिळणार आहे.
buggati2
ही कार म्हणजे बुगाटीच्या बेबी कारचे नवे मॉडर्न वर्जन आहे. या कंपनीचा संस्थापक एतोरे बुगाटी याने त्याच्या मुलाच्या ४ थ्या वाढदिवशी पहिली बेबी टॉय कार बनविली होती. १९२७ ते १९३६ या काळात ५०० बेबी कार विकल्या गेल्या होत्या. ही कार म्हणजे रेसिंग कार टाईप ३५ चे छोटे रूप होते. कंपनीने ११० व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून बेबी कारचा हा नवा अवतार सादर केला आहे.
buggati3
या कार मध्ये लेदरसीट, अल्युमिनियम डॅशबोर्ड, ४ स्पोक स्टिअरिंग व्हील, कस्टम इंस्ट्रुमेशन आहे. ही कार मोठ्या व्यक्ती चालवू शकणार आहेत तसेच लहान मुलेही चालवू शकणार आहेत. या इलेक्ट्रिक कार ला दोन पॉवर मोड आहेत. चाईल्ड मोडचा टॉप स्पीड ताशी २० किमी तर अॅडल्ट मोडचा टॉप स्पीड ताशी ४५ किमी आहे. म्हणजे एकदा ही कार घेतली कि बच्चा भी खेलेगा, बच्चे का बाप भी खेलेगा असा अनुभव ग्राहक घेऊ शकणार आहेत.

Leave a Comment