बक्षी कप बद्दलची खास माहिती

bakshicup
जगभरात आता आयपीएल २०१९ ची चर्चा आणि प्रतीक्षा सुरु झाली असून सर्वत्र उत्साहाचा माहोल आहे. २३ मार्च पासून क्रिकेटचा हा महाकुंभ सुरु होईल मात्र नुकताच देशात आणखीही एक क्रीडा महोत्सव साजरा झाला त्याची अनेकांना माहितीही नसेल. या महोत्सव म्हणजे बक्षी कप स्पर्धा. देशाच्या लष्करातील तमाम दलात प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकारी साठी हा खेलोत्सव दर दोन वर्षांनी घेतला जातो.

यात पायदळ, हवाई दल आणि नौका दलातील प्रशिक्षणार्थी अधिकारी एकमेकांशी स्पर्धा करतात. १२ मार्च पासून देशातील सहा डिफेन्स अकादमीमध्ये त्याची सुरवात झाली आणि पाच दिवस हा उत्सव झाला. यात यंदाही इंडिअन नेव्ही अकादमीने बक्षी कप जिंकला. आयपीएल मध्ये ८ टीम असतात तश्या येथे ६ टीम्स असतात. इंडिअन मिलिटरी अकादमी देहरादून, एअरफोर्स अकादमी हैद्राबाद, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई आणि गया, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला, आणि इंडिअन नेव्ही अकादमी एझीमान यांचा त्यात सहभाग होता.

लष्करी अधिकाऱ्यामध्ये टीम स्पिरीट वाढविणे हा त्यामागचा मुख्य उद्देश. यात फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, क्रॉस कंट्री, टेनिस आणि स्व्कॅश यांच्या स्पर्धा होतात. यंदा यात ३७४ खेळाडू सहभागी झाले होते. खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे तत्कालीन कमांडंट मेजर जनरल रणबीर बक्षी यांच्या नावावरून या स्पर्धांना बक्षी कप असे नाव दिले गेले आहे.

Leave a Comment