सलमान-आलिया भन्साळींच्या ‘ईन्शाल्ला’मध्ये झळकणार

TRIO
तब्बल २० वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एकत्र काम करणार असून नुकतीच या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार आहे. या चित्रपटाचे ‘ईन्शाल्ला’ असे नाव असून याविषयीची माहिती सलमान आणि आलियाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

या चित्रपटात आधी सलमानसोबत शाहरुख खान झळकणार असल्याचीही चर्चा होती. त्याचप्रमाणे अभिनेत्री दीपिका पादुकोणसाठी भन्साळी आग्रही असल्याचेही म्हटले जात होते. पण अखेर सलमान आणि आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अखेर मी आणि संजय २० वर्षांनंतर परततो आहे. आलियासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे ट्विट सलमानने केले. तर आलियानेही ट्विट करत तिचा आनंद व्यक्त केला. संजय लीला भन्साळींच्या ऑफीसमध्ये मी नऊ वर्षांची असताना पहिल्यांदा गेले होते. तेव्हापासून त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहा असे म्हणतात आणि मी तेच केले. संजय सर आणि सलमान खान ही जो़डी अप्रतिम आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्यात मी खूप उत्सुक असल्याचे ती म्हणाली. २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे.

यामुळे आलियाने आपल्या ड्रायव्हर आणि हेल्परला दिला 50 लाखांचा चेक

Leave a Comment