यामुळे आलियाने आपल्या ड्रायव्हर आणि हेल्परला दिला 50 लाखांचा चेक

alia-bhatt
स्टार किड असलेल्या अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले. पण आलिया सोशल मीडियात काही न काही कारणामुळे चर्चेत असते. पण यावेळी ती तिने केलेल्या एका आगळ्या वेगळ्या कामामुळे चर्चेत आली आहे. त्याच बरोबर तिच्या या कामाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

वडिल महेश भट्ट आणि मित्र करण जोहरच्या व्यतिरिक्त आणखी दोन व्यक्ती आलियाच्या आयुष्यात फार महत्वाच्या आहेत. आलिया त्यांच्याविना कोणतेही काम करु शकत नसल्याचे तिने कबूलही केले आहे. त्या व्यक्ती म्हणजे तिचा ड्रायव्हर सुनिल आणि मदतनीस अनमोल. आलियाने सुनिल आणि अनमोल यांच्यावरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी तिच्या २६व्या वाढदिवसा निमित्त तब्बल ५० लाखांचा चेक त्यांना भेट म्हणून दिला आहे. तसेच त्यांनी तिने दिलेल्या रक्कमेत मुंबईमध्ये स्वत:ची घरे घ्यावीत असे आलियाला वाटते. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुहू आणि खारदांडा येथे सुनिल आणि अनमोलने १ बीएचके रुम बुक केला असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment