या विंग कमांडरच्या बायोपिकमध्ये झळकणार अजय देवगण

ajay-devgan
यंदाच्या वर्षी बॉलीवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण याचा तानाजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यानंतर तो एका बायोपिकमध्ये झळकणार असून त्याची माहिती अजयने नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. भारत-पाक युद्धातील हवाई दलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका अजय देवगण साकारणार आहे.

यामुळे आलियाने आपल्या ड्रायव्हर आणि हेल्परला दिला 50 लाखांचा चेक

या चित्रपटाचे नाव ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ असे असून या चित्रपटाला १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी असणार आहे. भारत पाकिस्तान युद्धावर यापूर्वी अनेक चित्रपट आले पण ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात हवाई दलाचे युद्धातील योगदानाची पार्श्वभूमी असणार आहे. या चित्रपटात अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. कर्णिक हे भारत पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते.

भूज तळावरील धावपट्टी युद्धादरम्यान पाकिस्तान हवाई दलाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. कर्णिक यांनी त्यावेळी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. त्यांनी ३०० महिलांच्या मदतीने तळ पुन्हा बांधला होता. त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि हवाई दलाचे योगदान याची शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment