शाओमीच्या 49 इंचीच्या स्मार्ट टिव्हीच्या किंमतीत केली कपात

smart
तुम्ही जर एखादा मोठ्या स्क्रिनचा स्मार्ट टिव्ही घेण्याच्या विचार करत असाल तर शाओमी कंपनी तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आले आहेत. शाओमीने आपल्या एमआय टिव्ही 4ए प्रो 49 इंचाच्या स्मार्ट टिव्हीच्या किंमती 1 हजार रुपयांची कपात केली आहे.

एमआय टिव्ही 4ए प्रो 49मध्ये फुल एचडी एलईडी डिस्प्ले, ६४ बिटचे क्वॉडकोर एमोलॉजिक प्रोसेसर, २ जीबी रॅमसह ८ जीबी स्टोरेज, २० वॉटचे स्टिरिओ स्पीकर, अँड्रॉईड सपोर्ट, शाओमी पॅचवॉल, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये २ युएसबी पोर्ट, ३ HDMI पोर्ट, १ एवी पोर्ट, एक इथरनेट आणि वाय-फाय सपोर्ट हे फिचर्स देण्यात आले आहेत.

शाओमीचे अधिकृत संकेतस्थळ, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि एमआय होमवरुन एमआय टिव्ही 4ए प्रो 49 आता 29,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहेत. अलीकडेच सॅमसंगने 4K टीव्ही लाँच केला होते. यासह अन्य कंपनींनी मोठ्या स्क्रिनचे टीव्ही लाँच केले असल्यामुळे भारतीय बाजारपेठे स्मार्ट टीव्ही वॉर जोर धरत आहे.

Leave a Comment