इंस्टाग्रामवरील सगळे फोटो सुशांत सिंह राजपूतने केले डिलीट

sushant-singh
नुकताच ‘सोनचिडियां’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सुशांत सिंह राजपुत हा तुमच्या भेटीला आला होता. त्यानंतर तो आता दिल बेचारा हा चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. सुशांत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे आपण पाहिले आहे. पण आता त्याने अचानकपणे त्याच्या इंस्टाग्रामवरील आपले सगळे फोटो डिलीट केले आहेत.


यापुढे यामाध्यमातून आपण आपल्या चाहत्यांशी संवाद साधणार नसल्याचे म्हणत त्याने आपले सर्व फोटो आणि पोस्ट डिलीट केल्या आहेत. पण हे करण्यामागचे कारण त्याने अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. इंस्टाग्रामवर सुशांतचे 78 लाख फॉलोअर आहेत. सुशांतने अचानक इन्स्टाग्रामला रामराम ठोकल्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. सुशांतचा ‘सोनचिडियां’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यामुळे इन्स्टाग्रामवरून त्याने पोस्ट डिलीट केल्या असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याने या चित्रपटात दरोडेखोराची भूमिका साकारली होती.

Leave a Comment