मोदींच्या बायोपिकमधील विवेकचे 9 नवीन लूक रिलीज

narendra-modi
बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला बायोपिकचे वारे वाहत आहेत हे काही तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. आता बॉलिवूडकरही प्रेक्षकांच्या भेटीला राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही घेऊन येत आहेत. त्यातच हे चित्रपट तिकीटबारीवर भरघोस कमाई देखील करत आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट यापूर्वी तुमच्या भेटीला येऊन गेले. त्यापाठोपाठ आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक देखील लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे काही पोस्टर देखील तुमच्या भेटीला आले होते. आता या चित्रपटातील मुख्य अभिनेता विवेक ऑबेरॉयचे 9 विविध लुक असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत.


या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. आता या बायोपिकमधील विवेक ओबेरॉयचे मोदींच्या भूमिकेतील वेगवेगळे ९ लूक शेअर करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार करणार आहेत, तर संदीप सिंग, सुरेश ओबेरॉय आणि आनंद पंडित यांची निर्मिती असणार आहे. मनोज जोशी या चित्रपटात अमित शहांच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाशिवाय मोदींच्या जीवनावर आधारित वेबसीरिजही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment