जर तुम्हीही चौकीदार आहात तर कोणीही महिला सुरक्षित नाही – रेणूका शहाणे

renuka-shahane
काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने आणलेले #MeToo हे वादळ बी-टाऊनवर घोंघावत होते. या वादळाने एवढे रौद्ररुप धारण केले की यात भलेभले कलाकार गोपले गेले. सोशल मीडियावर याची सर्वात जास्त चर्चा झाली होती. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील अनेक महिलांना आपल्या सोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटना समाजासमोर मांडल्या होत्या. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांचे खरे चेहरे या मोहिमेमुळे जगासमोर आले. माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांचेही नाव यात सामील आहे.


आता रेणूका शहाणेने याच पार्श्वभूमीवर अकबरांना सुनावले आहे. सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मै भी चौकीदार’ही नवी प्रचार मोहीम राबवली जात आहे. माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यांनी ट्विट करत ‘मै भी चौकीदार’ या माहिमेचा भाग होत असल्याचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे. रेणूका शहाणेने यावरच बोलताना म्हटले, तुम्हीही जर चौकीदार आहात तर कोणतीही महिला सुरक्षित नाही. यापूर्वी अकबर यांच्यावर अश्लिल मेसेज आणि असभ्य कमेंट केल्याचा एका महिला पत्रकाराने आरोप केला होता. तर इतरही अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.

Leave a Comment