तुमच्या लॅपटॉपलाच हे अ‍ॅप बनवेल मोबाईल

airdroied
सध्या धकाधकीच्या काळात आपण आपला मोबाईल कधी विसरलो तर आपली काय पंचाईत होते याचा अनुभव आपल्यापैकी कित्येक लोकांनी घेतलाच असेल. पण आता मोबाईल विसरला तरी टेंशन घेण्याचे कारण नाही. कारण आता तुमचा लॅपटॉपच तुमचा मोबाईल होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एक अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्याचबरोबर काम करताना मोबाईलवर येणारे नोटीफिकेशन तुम्हाला सतत त्रासदायक वाटत असतील तर त्यापासून देखील तुमची सुटका होणार आहे.

तुम्हाला लॅपटॉपला मोबाईल बनवण्यासाठी एअरड्रोईड (AirDroid) अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. याद्वारे तुम्ही लॅपटॉप आणि कंम्युटरला हाताळू शकता. मोबाईल आणि लॅपटॉपला एकाच नेटवर्कला जोडून ठेवण्यासाठी तुम्हाला एअरड्रोईड मदत करते. एअरड्रोईड मल्टी स्क्रीन अॅप असून Windows आणि Mac platformला हे अॅप सपोर्ट करते.

एअरड्रोईड अॅप सर्वप्रथम डाऊनलोड करा. त्यानंतर web.airdroid.com टॅब ओपन करा. यावेळी वेळी एका विंडोवर QR कोड येईल. त्यानंतर तुम्ही लॅपटॉपवरून मोबाईल हाताळू शकता. एअरड्रोईड अॅपवरून तुम्ही कॉल देखील करू शकता. फोटो आणि व्हिडीओ देखील पाहू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे फाईल ट्रान्सफर देखील करू शकता.

Leave a Comment