
देसी गर्ल प्रियंका चोप्राची बी-टाऊनमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत नाव घेतले जाते. कुठल्याही कार्यक्रमासाठी ती विचारपूर्वक पद्धतीने आपले आऊटफीट निवडते. प्रियंका नुकतीच मुंबईतील सोहो हाऊसमध्ये गेली होती. तिचा अंदाज यावेळी काहीसा वेगळा होता. या आऊटफिटमधील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण तुम्हाला या ड्रेसची मूळ किंमत माहीत आहे का?
एका आयफोन एक्सएस मोबाईल एवढी प्रियंकाच्या ड्रेसची किंमत
या ड्रेसची किंमत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘एट्रो’च्या अधिकृत कलेक्शनमधील प्रियंकाचा हा ड्रेस आहे. या ड्रेसची किंमत वाचून तुम्ही खरंच थक्क होऊन जाल. एका आयफोन एक्सएस मोबाईलच्या किंमती एवढी या ड्रेसची किंमत आहे. यात एखादी मध्यमवर्गीय व्यक्ती परदेशात फिरून येऊ शकतो. ‘एट्रो’च्या अधिकृत वेबसाइटवर जर तुम्ही या ड्रेसची किंमत पाहिली तर ही किंमत १ लाख ९० हजार १५५ रुपये एवढी आहे. साहजिकच आंतरराष्ट्रीय दर्जाची सेलिब्रिटी असल्यामुळे प्रियंकाला ही किंमत देणे फार कठीण नाही.
