
वादग्रस्त पण तितकाच गाजणारा ‘बिग बॉस’ हा शो गेल्या वर्षी मराठीत आला. या शोचे सुत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. त्याचवेळी ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता याबद्दलची माहिती कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे.
‘बिग बॉस मराठी’चे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
तो परत येतोय… #BiggBossMarathi #BBMarathi #ColorsMarathi pic.twitter.com/K3coqCNuNU
— Colors Marathi (@ColorsMarathi) March 17, 2019
ट्विटरद्वारे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची झलक शेअर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा नवीन लोगो ‘तो परत येतोय’ म्हणत प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान या शोच्या दुसऱ्या पर्वाचे सुत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
पहिल्या पर्वात उषा नाडकर्णी, जुई गडकरी, सुशांत शेलार, विनीत बोंडे, भूषण कडू, अनिल थत्ते, सई लोकूर, आस्ताद काळे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, मेघा धाडे यांसारख्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती.
