स्वतःचा टिव्ही चॅनल सुरु करण्याच्या विचारात भाईजान

salman-khan
आपल्या स्वतःच्या सलमान खान फिल्म प्रॉडक्शनच्या माध्यमातून बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने अनेक नवीन चेहरे बॉलीवूडला दिले आहेत. मोठ्या पडद्यासह छोट्यापडद्यावर ही सलमानने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता सलमान खान आपल्या स्वतःच्या मालकीचा टिव्ही चॅनल सुरु करण्याच्या विचारात आहे.

सलमाननेच कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोची निर्मिती केली आहे. आता खुद्द भाईजानच एक नवा चॅनल घेऊन येत असल्याचे म्हटल्यानंतर त्यासाठी भांडवल आलेच. त्यातच कपिल शर्माचा शो त्याच्या नव्या चॅनलवर शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप टीव्ही चॅनेलचे लायसन्स सलमानला मिळाले नसल्याचे समजत आहे. या टीव्ही चॅनेल शिवाय ‘बीईंग चिल्ड्रेन’ नावाचे एक फाऊंडेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या फाऊंडेशनमध्ये मुलांचे शिक्षण आणि त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे.

अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या चित्रपटाचे सलमान खानने नुकतेच शुटिंग संपवले आहे. तसेच १ एप्रिलपासून सलमान ‘दबंग ३’ चे शुटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा, बॉबी देओल, कन्नड स्टार किच्चा सुदीप देखील असणार आहेत.

Leave a Comment