एचआयव्ही पीडितांकडून चालवला जातो हा कॅफे !

cafe
एचआयव्ही या शब्दाचा जरी उल्लेख केला तरी आपल्या काळजात एकच धडकी भरते. आपल्या समाजात या आजाराची भीती फार जास्त पसरली आहे. पण कुणाला स्पर्श केल्याने किंवा त्या व्यक्तीसोबत जेवण केल्याने हा आजार पसरत नाही. कोलकातामध्ये हेच सांगण्यासाठी एका कॅफेची सुरूवात करण्यात आली आहे. एचआयव्ही पीडित लोक हा कॅफे चालवतात. आपल्या देशातील हा अशाप्रकारचा पहिला कॅफे आहे.
cafe1
‘कॅफे पॉझिटिव्ह’ असे कोलकात्यातील या कॅफेचे आहे. एक समाजसेवी संस्थेने हा कॅफे सुरु केला आहे. एचआयव्हीसंबंधी समाजातील लोकांमध्ये परसलेले गैरसमज दूर करण्यासाठी या समाजसेवी संस्थेने सुरूवात केली आहे. ‘कॅफे पॉझिटिव्ह’ चे संस्थापक काल्लोल घोष असून त्यांनी सांगितले की, १० एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक या कॅफेमध्ये काम करतात. हे लोक अकाऊंट बघणे, ग्राहकांना सेवा देणे हे काम करतात. किचनमध्ये वेगळे लोक काम करतात.
cafe2
लोकांमध्ये एचआयव्हीबाबत असलेले गैरसमज दूर करणे हा या कॅफे सुरू करण्याचा उद्देश आहे. अनेकजण या कॅफेचे कौतुक करत आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकांना हे आधीच माहीत असते की, येथे एचआयव्ही पीडित काम करतात. लोक आता काही प्रमाणात याबाबत जागरूक होत आहेत. खरंतर अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे एचआयव्ही पीडित लोकांना जगण्याची एक नवीन किरण मिळण्यास मदत होते. तसेच त्यांना समाजात मान वर करून जगण्याचीही दिशा मिळते. त्यामुळे अशाप्रकारचे उपक्रम आणखी व्हावे, ही अपेक्षा आपण करू शकतो.

Leave a Comment