तब्बल 16 वर्षांनंतर येत आहे ‘इश्क विश्क’चा सिक्वल

sequel
2003 मध्ये शाहिद कपूर, अमृता रावचा ‘इश्क विश्क’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळला होता. आता तब्बल 16 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल तुमच्या भेटीला येणार असून या वृत्ताला चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील दुजोरा दिला आहे.

‘इश्क विश्क’ चा सिक्वल येत असल्याच्या वृत्ताला निर्माते रमेश तोरानी यांनी दुजोरा दिला आहे. सध्या सिक्वलच्या कथेवर काम सुरु असून आगामी काही महिन्यातच चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होऊन लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल अशी माहिती त्यांनी एका मुलाखतीत दिली.

या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा पहिल्यांदा 2014 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी या चित्रपटाचा सिक्वल ‘रेस 3’ मुळे रखडला होता असे म्हटले जात होते. ‘रेस 3’ वर तोरानी यांनी आपले संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचे ठरवल्यामुळे हा चित्रपट रखडला होता. मात्र आता बॉलिवूडमध्ये सीक्वलचा ट्रेंड रुजू होत आहे हा ट्रेंड ओळखूनच तोहरानी यांनी ‘इश्क विश्क ‘ च्या सीक्वलची घोषणा केली.

Leave a Comment