मनोहर पर्रिकर अनंतात विलीन

manohar-parrikar4
दोनपौला – देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय आहेत.

मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर मीरामार या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोहर भाई अमर रहें या घोषणा देण्यात आल्या. एक लढवय्या नेता म्हणून मनोहर पर्रिकर प्रसिद्ध होते. मात्र कर्करोगाने त्यांना हरवले. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

केंद्र सरकारने सोमवारी त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे. ही बातमी रविवारी येताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली. मनोहर पर्रिकर हे त्यांच्या साधेपणासाठी आणि त्यांच्या पारदर्शी स्वभावासाठी प्रसिद्ध होते.

Leave a Comment