महिला प्रवाशाचे कपडे पाहून भडकली एअरलाईन, म्हणाले अंग झाक नाही तर खाली उतर

dreess
लंडन: ब्रिटनच्या एका विमान कंपनीने एका 21 वर्षीय महिला प्रवाश्याला तंग कपड्यावरुन धमकवले आणि त्यानंतर उद्धभवणारा वाद पाहात माफी देखील मागितली आहे. याबाबत प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार विमानात प्रवेश केल्यानंतर त्या महिलेला व्यवस्थित कपडे न घातल्यामुळे धमकवण्यात आले आणि तिला विमानातून उतरण्यास सांगण्यात आले.

यासंदर्भात सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार एमिली ओ’कोनॉरने 2 मार्च रोजी बर्मिंगहॅम विमानतळावरून टेनेरिफ आयलँडला जाण्यासाठी थॉमस कुक एअरलाइन्समध्ये चढली होती. त्यादरम्यान विमानातील क्रु मेंबर्संनी तिला सांगितले की, तुझे कपडे हिंसाचारासाठी कारणीभूत ठरु शकतात.


एमिली म्हणाली, फक्त माझ्या कपड्यांवरुन मला विमानतळापासून विमानात चढेपर्यंत चेतावणी दिली गेली. तेव्हा क्रूच्या सदस्यांनी मला स्वतःला झाकून घेण्यास सांगितले. तिने सांगितले की विमानाचा व्यवस्थापक त्याच्या चार सदस्यांसह माझ्याजवळ आला. एअरलाइन मॅनेजर त्याच्यासोबत इतर चार सदस्यांसह आला. त्याने जॅकेट घालण्यास सांगितले आणि धमकी दिली की तुला विमानातून उतरवले जाईल.

सीएनएनने सांगितले की थॉमस कूक एअरलाईन्सने एमिली ओकोनोर हिची माफी मागत, केबिन सेवेच्या संचालकांना याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले. याबाबत थॉमस कुक एअरलाईन्सने जारी केलेल्या निवेदनात मॅनेजरकडून मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल एअरलाइन्सने एमिलीची माफी मागितली आणि अशा प्रकारचे प्रकरण समोपचारने देखील मिटवता आले असते असे म्हटले आहे.

एअरलाईन्सने म्हटले, सर्वसाधारणपणे, बऱ्याच एअर कंपन्यांनी प्रवाशांच्या कपड्यांविषयी वेगवेगळे नियम केले आहेत, हे महिला आणि पुरुष दोघांसाठीही लागू होतो, म्हणून आमच्या क्रू सदस्यांसाठी ते पुरेसे आहे. प्रवाशांना ते पाठवणे कठीण आहे. कधीकधी गोष्टी आणखी वाईट होतात. या हवाई कंपनीच्या कपड्या धोरणाखाली, असे कोणतेही कपडे घालुन प्रवासी विमानात चढु शकत नाही, ज्यामुळे धोका निर्माण होईल.

Leave a Comment