
१४ मार्च रोजी वयाची ५४ वर्षे पूर्ण केलेले बॉलीवूड अभिनेता आमीर खान याने त्याच्या आगामी लालसिंग चढ्ढा चित्रपटाची घोषणा केली आहे आणि त्याचवेळी अॅक्टींग करणे सोडणार असल्याचेही सांगितले आहे. मात्र त्याबाबत एक खुलासाही केला आहे. आमीर म्हणतो सिनेमा बनविणे आणि दिग्दर्शन करणे त्याला फार आवडते पण दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही एकाचवेळी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याच्यातील दिग्दर्शकाला त्याने सध्या दाबून ठेवले आहे. पण एकदा दिग्दर्शनाला सुरवात केली कि तो अभिनय करणार नाही.
आमिर खान सोडणार अभिनय, पण केव्हा?
आमीर सांगतो तारे जमीं पर या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते. त्याचे करिअर जरी अभिनेता म्हणून सुरु झाले असले तरी त्याला चित्रपट निर्मितीत रस आहे आणि केवळ पैसे मिळविण्यासाठी तो निर्मिती करत नाही तर चित्रपटाची कथा चांगली असेल तरच करतो. केवळ बॉलीवूडचा नाही तर जगातील कोणत्याची चित्रपटसृष्टीत त्याला काम करायला आवडेल फक्त चित्रपटाची कथा काय आहे. त्यातून कोणता संदेश दिला गेला आहे आणि मुख्य म्हणजे कथा त्याला एक्साईट करणारी असेल तर कोणता देश चित्रपट बनवितो यांनी त्याला फरक पडणार नाही.
