महिला फुटबॉल खेळाडू पोटातील बाळासह मैदानावर

sidney
अमेरिकन स्टार फुटबॉलर आणि कॅनडाच्या ऑरलंड क्लबची सेंटर फोरवर्ड खेळाडू सिडनी हिने सहा महिन्याची गरोदर असतानाही फुटबॉल मैदानावर उतरून सर्वाना सुखद धक्का दिला आहे. नोव्हेंबर मध्ये तिने प्रेग्नंट असल्याची घोषणा केली तेव्हा किमान ९ महिने तरी ती आता फुटबॉल मैदानावर दिसणार नाही असे वाटले होते मात्र गेल्या आठवड्यात तिने मैदानावर उतरून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सोमवारी तिने हे फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केले.

अर्थात सिडनेला दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींनी तिला सुपरमॉम म्हटले आहे तर काहींनी पैश्यासाठी जोखीम पत्करत असल्याची टीका केली आहे. सिडने हिने टीकाकारांना उत्तर देताना म्हटले आहे, पैश्यासाठी जोखीम पत्करते अशी टीका फक्त पुरुष करू शकतात. कारण त्यांना मुलाला जन्म देणे म्हणजे काय हे माहित नसते. तेव्हा त्यांनी गप्प राहावे हे चांगले.

सिडने म्हणते यंदाचा सिझन मी खेळू शकणार नाही पण पुढच्या सिझनचा सराव सुरु केला आहे. मी पैशासाठी नाही तर आनंदासाठी फुटबॉल खेळते. अमेरिकन फुटबॉल टीमला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देण्यात सिडने हिने मोठे योगदान दिले आहे.

Leave a Comment