इंटरनॅशनल ई-कॉमर्स कंपन्यांकडून भारतीय करत आहेत दणकून खरेदी

onlain
भारतात ऑनलाईन खरेदी चांगलीच लोकप्रिय होत असताना भारतीय ग्राहकात परदेशी ऑनलाईन कंपन्यांकडून खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालल्याचे दिसून आले असून यात चीनी अलिबाबा आघाडीवर आहे. यामुळे भारतीय इ कॉमर्स कंपन्यांना तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे.

या परदेशी कंपन्या ग्राहकाचे सामान भारतात सरळ डिलिव्हर करत असून भारतात फक्त अलीबाबाचे ४५ लाख युजर्स आहेत. जपान, युके मधून ही साईट चालविली जाते. भारतीय ग्राहकांना तिची भुरळ पडण्यामागे स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू कारणीभूत आहेत. भारतीय विक्रेते याच वस्तू ग्राहकाला देताना उत्पादन विक्रीतील त्यांचा फायदा, भारतात आणताना येणारा खर्च आणि कर लावून या वस्तू विकतात. त्याउलट चीनी उत्पादक थेट ग्राहकांना वस्तू विकतात. कस्टम ड्युटी आणि शिपिंग खर्च भरूनही या वस्तू ग्राहकाला स्वस्त मिळतात. तसेच पाच हजारापेक्षा कमी किमतीच्या वस्तूंना कस्टम ड्युटी भरावी लागत नाही कारण त्या गिफ्ट कॅटेगरी मध्ये धरल्या जातात असे समजते.

भारतात इ कॉमर्स मार्केट २०२० पर्यंत ४९ लाख कोटींवर जाईल असा अंदाज असून देशातील ८० टक्के ग्राहक फ्लिपकार्ट, अमेझोनचा वापर करतात तर २० टक्के विदेशी साईटला पसंती देत आहेत. त्यात चीनी अलिबाबा बरोबर जपानी होबोनीची तसेच चीनी ड्रेसलिमी डॉट कॉम, जेडी डॉट कॉम यांचाही समावेश आहे. अलिबाबाचे प्रमुख तीमोयी ल्युंग यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत अलिबाबा साठी चीन नंतर दुसरा महत्वाचा बाजार असून व्यवसाय वाढीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

Leave a Comment