अमेरिकेतील महिलेने 9 मिनिटात दिला चक्क 6 मुलांना जन्म

birth
वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सासमधील ह्युस्टन येथील एका महिलेने 6 बाळांना जन्म दिला असून असा प्रकार जगात 4.7 अब्ज लोकांमध्ये एकच होतो, ज्यामध्ये एकाच वेळी 6 बाळांना महिला जन्म देते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. थेलमा नावाच्या महिलेने द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सासमध्ये 6 बाळांना जन्म दिला आहे. शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार चार वाजून 50 मिनिटांनी रुग्णालयात पहिल्या मुलाला जन्म दिला.

थेलमाने पहिले मुल जन्मल्यानंतर पुढच्या नऊ मिनिटात 6 बाळांना जन्म दिला. यामध्ये चार मुले आणि दोन मुली आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांनी थेलमा आणि बाळांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले.


याबाबत रुग्णालयाच्या ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार मुलांचे वजन 1 पौंड 12 औंस ते 2 पौंड 14 औंसच्या दरम्यान असून रुग्णालयाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही म्हटले आहे. जीना आणि ज्युरियल अशी थेलमाने तिच्या मुलींची नावे ठेवली आहेत. तर तिने तिच्या चार मुलांची नावे अद्याप ठेवलेली नाहीत.

Leave a Comment