मोदींनी जाहिरातबाजीवर उधळले 3044 कोटी रुपये – मायावती

mayawati1
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहिरातबाजीवर 3044 कोटी रूपये खर्च केल्याचा दावा बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. उत्तर प्रदेशसारख्या मागासवर्गीय राज्यातील प्रत्येक खेड्यात शिक्षण व आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जाहिरातींवर खर्च होणारा पैसा खर्च केला जाऊ शकत होता, पण परंतु मोदींना कोट्यावधी रूपये केवळ जाहिरातबाजीवर उधळले असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.


सध्या विकासकामांच्या उद्घाटनांमध्ये पंतप्रधान मोदी व्यस्त आहेत. मागास राज्यातील गावात शिक्षण आणि चांगले आरोग्य देण्यासाठी हा जनतेचा पैसा वापरला जाऊ शकत होता. पण हा पैसा सामाजिक कल्याणासाठी वापरण्यापेक्षा भाजपच्या जाहिरातींवर पैसे खर्च करणे मोदींना अधिक गरजेचे वाटत असल्याचे ट्विट केले आहे.

मोदी सरकारकडून सध्या भाजप सरकारचे अपयश झाकोळण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून गरिबी आणि बेरोजगारी या अतिमहत्त्वाच्या मुद्यांची ऐन निवडणूकीच्या दिवसांत चर्चा होणार नाही. पण अशा वेळी जनतेने सतर्क राहणे अतिशय गरजेचे असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

Leave a Comment