जगभरातील हे गर्भश्रीमंत आपल्या भावी पिढीसाठी ठेवणार नाही एकही दमडी

trio
आपल्या देशातील प्रत्येक आई-बाप आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी काहीना काही मालमत्ता, बचत केले पैसे जमा करत असता. पण या जगात असे देखील गर्भश्रीमंत आहेत जे आपल्या भावी पिढीसाठी एक दमडी देखील ठेवणार नाही आहेत. त्याच गर्भश्रीमंतांची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
trio1
जगातील दोन नंबरचे श्रीमंत म्हणजे मायक्रोसॉफ्टचे बिल और मिलिंडा गेट्स यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. फोएबे आणि जेनिफर अशी मुलींची नावे आहेत, हॅरॉरी असे मुलाचे नाव आहे. बिल गेट्स हे आपली सर्व संपत्ती दान करणार आहेत. त्यांनी त्यासाठी आपल्याच नावाचे फाऊंडेशन सुरू केले आहे. 2000मध्ये बिल गेट्स यांनी आपली पत्नी मिलिंडाच्या नावे एक फाऊंडेशन सुरू केले. 2013मध्ये बिल गेट्स यांनी या संस्थेला 28 बिलियन अमेरिकन डॉलर्स दान केले.
trio2
जगातील तिसरे क्रमाकाचे श्रीमंत म्हणजे वॉरेन बफे यांनी अमेरिकेतील अनेक श्रीमंत व्यक्तींना दान करण्याची प्रेरणा दिली. त्यांना 3 मुले असून आपल्या संपत्तीतील 99 टक्के संपत्ती दान करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
trio3
38 हजार कोटी रुपयांचे मालक असलेले अमेरिकन सिनेनिर्माते आणि व्यावसायिक जॉर्ज लुकस यांनी 2012मध्ये डिस्नी स्टार वॉर प्रोजेक्ट विकून प्रचंड नफा कमविला होता. जॉर्ज यांना 4 मुले असून ते आपली अर्धी संपत्ती दान करणार आहेत.
trio4
आपल्या सर्वांच्या परिचयचे असणारे कुंग फू स्टार अभिनेते जॅकी चेन यांची 318.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते देखील आपली संपत्ती दान करणार आहेत. त्यांचे असे म्हणने आहे की त्यांच्या मुलांनी स्वतःसाठी संपत्ती कमवावी. त्याचबरोबर जॅकी चेन हे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व वन्य जीवांसाठी खुप पैसे खर्च करतात.

Leave a Comment