चला भेटू दक्षिण आफ्रिकेतील चित्रकार डुक्कराला

pig
या सोशल मीडियाच्या जगात कोण कशाप्रकारे प्रसिद्ध होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी काहीजण आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. पण आता सोशल मीडियात कोणी व्यक्ति नाही तर एक प्राणी खुप चर्चेत आला आहे. तो प्राणी डुक्कर असून तो दक्षिण अफ्रिकेत खुपच प्रसिद्ध झाला आहे. पण त्याच्या प्रसिद्धी मागे वेगळेच कारण आहे. कारण हे डुक्कर एक चित्रकार आहे. त्याचबरोबर पिकासोवरून त्याचे पिगकासो असे नाव ठेवण्यात आले आहे.
pig1
पिगकासो एक मादी असून कत्तलखान्यात जाण्यापासून पिगकासोला वाचवले तेव्हा ती 2 महिन्याची होती. या डुकराच्या तोंडात रंगांचा ब्रश दिला जातो आणि समोर कॅन्व्हास ठेवला जातो, तेव्हा ती चित्र काढायला सुरुवात करते. त्याचबरोबर pigcasso.myshopify.com अशी पिगकासोच्या पेंटिंग्जची वेबसाइट आहे. पिगकासोने काढलेली 64 चित्रे यात आहेत. लोक तेथे जाऊन ती चित्र पाहतात. पिगकासो आता 21 महिन्याची असून तिच्या चित्रांना खूप किंमत मिळत आहे. नुकतेच तिचे एक चित्र 3 हजार पाऊंडला विकले गेले आहे.
pig2
पिगकासोला कतलखान्यात जाण्यापासून दक्षिण आफ्रिकेची अॅनिमल वेलफेयर कँपेनर जोयने लेफसनने वाचवले होते. ती म्हणते, डुक्कर एक स्मार्ट प्राणी आहे. एकदा अचानक एका कर्मचाऱ्याच्या हातून पेंटिंगचा ब्रश पिगकासोने घेतला आणि सगळीकडे फटकारे मारू लागले. पिगकासोला तेव्हापासून कॅन्व्हास आणि रंग, ब्रश देण्यात येत आहे. तिला चित्रकार म्हणून मान्यता मिळत आहे. पिगकासो चित्र रंगवत असताना येथे राहणारा कुत्राही कुतूहलाने पहात असतो.