
लवकरच ‘जंगली’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विद्युत जामवाल तुमच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. ज्यात जबरदस्त स्टंट करताना विद्युत दिसत होता. आता नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून ज्यात विद्युतचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे.
‘जंगली’च्या नव्या पोस्टरवर विद्युतचा जबरदस्त अंदाज
Vidyut Jammwal… New poster of #Junglee… Costars Pooja Sawant, Asha Bhat and Atul Kulkarni… Directed by Chuck Russell… Produced by Vineet Jain… Co-produced by Priti Shahani… 29 March 2019 release. pic.twitter.com/bbzOkNbN2B
— taran adarsh (@taran_adarsh) March 15, 2019
विद्युतचे हत्तीसोबत असलेले घनिष्ठ नाते ‘जंगली’ चित्रपटात उलगडण्यात येणार आहे. विद्युतचा अॅक्शन सीन चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. यासोबतच चित्रपटाच्या इतर पोस्टरप्रमाणेच हत्तीची झलकही पाहायला मिळत आहे. हा फोटो चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केला आहे.
२९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला जंगली चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल यांनी केले आहे. तर विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात विद्युतशिवाय पुजा सावंत, आशा भट्ट आणि अतुल कुलकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
