…यामुळे विरेंद्र सेहवागचा निवडणुकीतून काढता पाय

virendra-sehwag
नवी दिल्ली – पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्यास भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने नकार दिला आहे. पश्चिम दिल्ली मतदारसंघातून उभा राहण्याची भाजपने सेहवागला ऑफर दिली होती. पण वैयक्तिक कारणांमुळे सेहवागने भाजपकडून लढण्यास नकार दिला आहे.

याबाबत माहिती देताना सध्या पश्चिम दिल्लीतून भाजप खासदार असलेले परवेश वर्मा यांनी सांगितले, विरेंद्र सेहवागच्या नावाचा पश्चिम दिल्ली मतदारसंघासाठी विचार चालू होता. पण काही वैयक्तिक कारणांसाठी सेहवागने पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. आपल्याला राजकारण आणि निवडणुका लढवण्यात रस नसल्याचे सेहवागने सांगितले आहे.

सेहवाग हा याआधी हरियाणातील रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, अशी फेब्रुवारी महिन्यात चर्चा सुरू होती. परंतु, सेहवागने ट्विटरवर पोस्ट करत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिल्ली भाजप प्रमुख मनोज तिवारी यांनी संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत सेहवागची भेट घेतली होती. यानंतर, सेहवाग भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

Leave a Comment