प्रत्येक भारतीयांच्या मोबाईलमध्ये सर्रास आढळतात ही चीन अॅप्स

china
सध्याच्या घडीला डिजीटल युग सुरु असून प्रत्येकजण डिजीटल झाला आहे. त्यातच आपल्या हातात स्मार्टफोन सारखे डिजीटल अस्त्र आल्यापासून आपण अधिकच डिजीटल झालो आहोत. आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे अॅप आपण डाऊनलोड करतो. त्यात युटिलिटीपासून व्हिडिओ आणि गेमिंग अॅप्सचा समावेश आहे. पण आपण जे काही अॅप्स डाऊनलोड करतो त्यात चीन मोबाईल अॅप्सचा देखील समावेश असतो आणि हे अॅप भारतीयांमध्ये खुप प्रमाणात लोकप्रिय आहेत. ज्यामध्ये TikTok, Like, ShareIT सारख्या मोबाईल अॅप्सचा समावेश आहे. या संदर्भात फॅक्टर डेलीने दिलेल्या एका अहवालानुसार भारतीयांवर या चीनच्या अॅप्सचा जबरदस्त प्रभाव आहे. त्याचबरोबर सेन्सॉर टॉवरच्या एका अहवालानुसार गुगल प्ले स्टोरवर 50 टक्के चीनी अॅप्सचा समावेश आहे.

तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का ही चीनी अॅप्स Hello Yo, Mafia City, Last Empire – War Z: Strategy, King of Avalon, Flash Keyboard, Turbo VPN, BIGO LIVE, Legacy of Discord-FuriousWings, Guns of Glory, ZAKZAK Pro, Clash of Kings, Castle Clash, CamScanner, Game of Sultans, Nono Live, Dating.com: meet new people, Webnovel, VMate 2019, BeautyPlus, Club Factory, All Video Downloader, Vigo Video, AppLock, UC Browser Mini, Vigo Lite, VMate Status, U-Dictionary, LovU, togetU, Live Chat, TikTok, LIKE Video, Helo, SHAREit, UC Browser, PUBG Mobile, TikTok Lite, Cut Cut, Share Music & Transfer Files-Xender, Lords Mobile, Uplive, LiveMe, Rise of Civilizations

सध्याच्या घडीला तरुणाईत TikTok हे अॅप लोकप्रिय असले तरीही या अॅपवर टीका करण्यात येत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार असे अनेक प्रकार समोर आले आहेत ज्यामध्ये TikTok चा वापर इमेज आणि व्हिडिओसोबत छेडछाड करण्यासाठी करण्यात आला. लहान मुलांनाही काही लोकांनी टार्गेट केल्यामुळे तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडे या अॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment