जंत, कृमी, गॅसेससाठी घरगुती उपचार

stomach

पोटात जंत होणे हे आपल्या परिचयाचे असते. अनेकवेळा कृमी झाल्यानेही पोट बिघडलेले असते. या व्याधींवर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. पण बरेचवेळा जंत झाल्याचे लक्षातच येत नाही. अशावेळी घरातील सर्वच लोकांनी विशेषतः ऋतू बदलतात तेव्हा म्हणजे उन्हाळा सुरू होताना अथवा पावसाळा सुरू होताना खाली सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली तर या व्याधी टाळता येतात.

१) पोटात जंत – लहान  मुलांमध्ये पोटात जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी १५ दिवस प्यायला दिल्याने जंताचा नाश होतो. दर सहा महिन्यांनी १५ दिवस असे पाणी द्यावे म्हणजे जंत होत नाहीत.

२) पोटातील कृमी- पोटात कृमींचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्‍याच वेळा मोठयांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी १५ दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणज रोठा सुपारी भांडंभर पाण्यात घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळुन काढा करावा.हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश  होतो.

३) लहान मुलांचा कफ – लहान मुलांत सर्दी होण्याचे प्रमाण अधिक  असते. यातूनच खोकला अथवा छातीत कफ भरतो. यावर २० ग्रॅम खोबरेल तेल म्हणजे तीन चमचे तेल त्यात ४– ५ थेंब निलगिरी तेल एकत्र करून नाक, छातीला चोळल्याने कफ कमी होतो.

४) रक्त वाढीसाठी – आजकाल बर्‍याच जणांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमियाचा त्रास होत असतो.यावर खजूराच्या  ४- ५  बिया १ महिनाभर खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

५) गॅसेस धरणे- बर्‍याच वेळा वेळी अवेळी जेवण, जड पदार्थांचे सेवन यामुळे पोटात वायू धरतो. शरीराची हालचाल कमी झाल्याने वृध्द व्यक्तीनांही हा त्रास अधिक होतो. त्यावर लिंबू सरबत पिणे उपयुक्त ठरते. तसेच १ भाग मिरे व सहा भाग साखर यांची सुंठवडयासारखी पावडर करून ती थोडी थोडी खावी. हीच पावडर कफ, दम लागणे, ठसका यावरही उपयुक्त ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “जंत, कृमी, गॅसेससाठी घरगुती उपचार”

Leave a Comment