मासिक पाळीतील त्रासावरचे उपाय

मुलगी वयात येऊ लागली की तिची मासिक पाळी कधी सुरू होतेय याची आईला अगदी डोळ्यात तेल घालून काळजी करावी लागते. कारण दर महिना येणारी ही पाळी बर्‍याच मुलींना तसेच महिलांनाही त्रासदायक ठरत असते. एकतर या काळात शरीरातील रक्त मोठ्या प्रमाणावर जात असल्याने अशक्तपणा येतोच पण पाळीच्या काळात पाय दुखणे, पोट दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे यासारखे त्रासही भोगावे लागतात. मात्र या काळात वेळीच काळजी घेतली तर हा त्रास कमी करता येतो.

१) मासिक पाळीचा स्त्राव अधिक होत असल्यास –  साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून कधीही पाळी सुरू होते. काही वेळा रक्तस्त्राव  अधिक असतो तर काही वळा तो अगदीच कमी असतो. स्त्राव साफ असणे हो आरोग्यासाठी महत्वाचे असते. जादा स्त्राव असेल तर कोहळा आणून किसावा. त्याचा पिळून  रस काढावा व १ कप रस अधिक २ चमचे साखर असे दिवसातून दोन वेळा घ्यावे. आवश्यकतेनुसार वापरून उरलेला कोहळा  रेफ्रिजिरेटरमध्ये न ठेवता ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा.

२) मासिक पाळीचा स्त्राव कमी असेल तर – तिळाचे सेवन उपयुक्त ठरते. १ महिनाभर रोज १ – २ चमचे तीळ खावेत. तीळकूट, तीळगुळ अशाही प्रकारात खाता येतील. दुसरा उपाय म्हणजे २० ग्रॅम कुळीथ अधिक १ लिटर पाणी उकळावे व हे मिश्रण १०० सीसी पर्यंत आटवावे.मग त्यात साखर व  मीठ घालून प्यावे. हा उपाय पाळी अगोदर पाच दिवस करावा.

३) अंगावर पांढरे जाणे- ज्याना हा त्रास होतो ती स्त्री बारीक असेल तर कोहळारस अधिक साखर मिश्रण दिवसातून दोन वेळा प्यावे. पण जाड अथवा स्थूल असेल तर डाळिबाचा रस १ ग्लास १० दिवस घ्यावा. डाळिबाचे दाणे स्वच्छ रुमालात घालून पिळावेत. निघालेल्या रसात साखर व मीठ घालावे.हा रस एकाच वेळी न पिता थोडया थोडया वेळाने दिवसभर प्यावा.

४) लघवी होताना जळजळ-रात्री पाण्यात धने भिजत घालून सकाळी हे पाणी प्यायल्याने हा त्रास कमी होतो. विशेषतः उष्णतेमुळे हा त्रास होत असेल तर तो या उपायाने नक्कीच कमी होतो

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही