टूथपेस्ट, साबणामुळे होतात मांसपेशी कमजोर

soap

साबण, डिओडरंट, टूथपेस्ट आणि इतर अनेक शरीर प्रसाधन उत्पादनांमध्ये ट्रिक्लोसन नामक एक अँटीबॅक्टेरिअल केमिकल वापरले जाते. मात्र हे केमिकल शरीरातील मांस-पेशींमधील शक्ती कमी करते, असे नुकत्याच एका अभ्यासातून समोर आले आहे. ट्रिक्लोसन बहुतेक सगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रसाधन उत्पादनांच्या रुपात आढळतेच. हे केमिकल पर्यावरणालाही हानीकारक ठरते.

soap

प्रयोगांमधून आणि त्यांच्या निष्कर्षावरून सिद्ध होते की ट्रिक्लोसन मानवी आरोग्याला आणि पर्यावरणालाही घातक आहे. असे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया- डेव्हिस स्कूल ऑफ व्हेटेरिनरी औषध आणि प्रिंसिपल स्टडी इन्वेस्टिगेटर आयझॅक पेसाह यांचे म्हणणे आहे. 

soap1

ट्रिक्लोसन हे अँटी-बॅक्टेरिअल बहुतेक सर्व सौंदर्य प्रसाधनांमध्ये आढळते. हँड सोप, डिओडरंट, माऊथवॉश, टूथपेस्ट, चटई, खेळणी, ट्रॅश बॅग यांसारख्या वस्तूंमध्ये ट्रिक्लोसन असते. मांसपेशांच्या हालचाली, पेशी आणि हृदयाच्या ठोक्यांवर या ट्रिक्लोसनचा नकारात्मक परिणाम होतो. 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही