मायक्रोसॉफ्टने आणलेल्या नव्या अपडेटमुळे आता अँड्रॉईड अॅप तुमच्या कंप्युटरवर!

windows
मुंबई : चाचणीसाठी एक अपडेट मायक्रोसॉफ्टने जारी केले आहे. तुमच्या खूप कामी येऊ शकते हे अपडेट. Windows 10 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अँड्रॉईड अॅप्लिकेशन सुरु करण्याच्या विचारात मायक्रोसॉफ्ट असून मायक्रोसॉफ्टने त्यासाठी Windows इंसाइडर्ससाठी ‘Phone Screen’ फिचरची सुरुवात केली आहे.

युझरकडे या ‘Phone Screen’ फिचरसाठी Windows 10 चे लेटेस्ट व्हर्जन आणि फोन अॅप्लिकेशन असणे आवश्यक आहे. Windows 10 मध्ये फोनची स्क्रिन थेट मिरर केली जाते. यानंतर तुमच्या कंप्युटरवर ते अॅप सुरु होते. अनेक अँड्रॉईड अॅप्लिकेशन येथे मिळतात ज्यापैकी कुठलेही एक आपल्याला निवडावे लागते. तुमच्या कंप्युटरमध्ये ते अॅप एक्सेस होईल.

तुमच्या मोबाईलमधील अॅप रिमोट सेशनच्या माध्यमातून कंप्युटरमध्ये मिरर केले जातील. या फिचरची सध्या चाचणी सुरु आहे. हे फिचर प्रत्येक कंप्युटरमध्ये काम करणार नाही. तसेच प्रत्येक स्मार्टफोनलाही ते सपोर्ट करणार नाही. चाचणी दरम्यान हे फिचर Galaxy S8, S8 Plus, S9 आणि S9 Plus मध्ये स्क्रिन मिररिंगचे फिचर मिळेल. हे फिचर सामान्य युझर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment