तुम्ही पाहिले आहेत का मिलिंद-अंकिताचे व्हायरल होत असलेले फोटो

milind-soman
आपल्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण हा चर्चेत होता. त्यानंतर मिलिंदने अंकिताशी विवाहबद्ध झाला.
milind-soman1
हे जोडपे सध्याच्या घडीला मालदीवमधील बेटावर सुट्टीचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर ते दोघेही सक्रीय असल्यामुळे अनेकदा त्यांचे फोटो ते इंस्टाग्रामवर शेअर करत असतात.
milind-soman2
आपल्या या कॅण्डिड फोटोमध्ये मिलिंद-अंकिता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. दोघे एका बीचवर बाथरोब घालून शांत बसलेले दिसत आहेत. त्यांचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
milind-soman3
यासोबतच त्यांचा किस डेला किस करतानाचा फोटो नेटकऱ्यांना आवडला होता. अंकिताने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर केला होता. मिलिंद आणि अंकिता गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात प्रेमामध्ये वय कधीच आडवं येत नाही हे दाखवत लग्नबंधात अडकले होते. अंकितापेक्षा मिलिंद तब्बल 26 वर्षांनी मोठा असूनही अंकिताने लग्नाला होकार दिला. मिलिंदने याआधी 2006 मध्ये अभिनेत्री मिलिन जैम्पेनोईसोबत लग्न केले होते. पण अवघ्या तीन वर्षातच ते वेगळे झाले होते.
milind-soman4
मिलिंद हा एक सुप्रसिद्ध मॉडेल असून एखाद्याने वयाच्या 53 व्या वर्षीही हॉट कसे दिसावे याचे मिलिंद उत्तम उदाहरण आहे. मॅराथॉनमध्ये धावण्याचे आणि पोहण्याचे त्याला जबरदस्त वेड आहे. देशासाठी आयर्नमॅन खिताबही मिलिंद याने जिंकला आहे.

Leave a Comment