सीएसएमटी स्टेशनजवळील फूट ओव्हर ब्रिज कोसळला

CSTM
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील फूट ओव्हर ब्रिज कोसळला असून यात दोघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या दुर्घटनेत 23 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून सध्या पुलाचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

23 जण या घटनेत गंभीर जखमी झाले असून सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना जखमींना हलवण्यात आले आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सध्या अग्निशमन दलातर्फे घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत.

Leave a Comment