या देशात वर्षातून दोनवेळा होते राष्ट्राध्यक्ष निवडणूक

marino
यंदा भारतात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्याचबरोबर जगातील अन्य ४३ देशातही निवडणुकांची धामधूम आहे. काही देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहे तर काही देशात राष्ट्राध्यक्ष निवडणुका होत आहेत. युरोप मधील सॅन मारिनो या देशात वर्षातून दोनवेळा राष्ट्राध्यक्ष निवडणूक घेतली जाते. म्हणजे दर सहा महिन्यांनी ही निवडणूक होते. या निवडणुकीला कॅप्टन रीजेंट असे नाव असून यंदा १ एप्रिल रोजी हि निवडणूक होणार आहे आणि त्याचा प्रचार सुरु झाला आहे.

भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे हि निवडणूक होते. म्हणजे त्यात फक्त निवडून आलेले प्रतिनिधी मतदान करतात. या देशाचा संसदेत ६० सदस्य आहेत. युरोपातील हा लोकशाही असलेला जुना देश असून त्याची लोकसंख्या आहे ३४०००. आकडेवारी सांगते १२४३ मध्ये प्रथम येथे कॅप्टन रीजेंट निवडणूक घेतली गेली होती. तेव्हापासून गेली ७७६ वर्षे हीच प्रक्रिया आहे. येथील खासदारांना अरेंगो म्हटले जाते.

युरोपातील छोट्या देशात या देशाचा समावेश असून त्याचे क्षेत्रफळ ६१ चौरस किलोमीटर आहे. या देशाची बहुतेक सीमा इटलीला भिडलेली असून येथे इटालियन भाषा बोलली जाते. २००९ पर्यंत हे देश टॅक्स हेवन म्हणून ओळखला जात होता मात्र त्याच वर्षी या देशाने आर्थिक पारदर्शिता स्वीकारली आणि त्यामुळे तो टॅक्स हेवन देशांचा काळ्या यादीतून बाहेर पडला. येथे खासदारांची निवड नागरिक दर पाच वर्षांनी करतात.

Leave a Comment