अपत्य जन्मानंतर सानिया मिर्झा पुन्हा टेनिस मैदानात

mirza
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मुलाच्या जन्मानंतर पुन्हा टेनिस कोर्टवर उतरण्याची तयारी करत असून त्यासाठीचा सराव तिने सुरु केला आहे. या संदर्भातला एक व्हिडीओ सानियाने तिच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या वर्षाखेर होणाऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी सानिया तयारीला लागली आहे. ऑगस्ट मध्ये होत असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत सानिया बाळंतपणानंतर पुन्हा टेनिस कोर्टवर दिसेल. सानियाच्या व्हिडीओ मुळे अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया तिला मिळत असून अनेकांनी ती पुन्हा टेनिस मैदानावर येत असल्याबद्दल तिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment