विना लायसन्स चालविता येणार ही दोन सीटर भन्नाट कार

quadri
जिनेवा ऑटो शो मध्ये भविष्यातील वाहने म्हणून एकापेक्षा एक सरस कन्सेप्ट कार सादर केल्या गेल्या असल्या तरी त्यात आकर्षणाचे केंद्र ठरली सीट्रोएन अमी वन ही छोटीशी इलेक्ट्रिक कार. या कारचे वजन अवघे ४२५ किलो असून ती दोन सीटर आहे. १६ वर्षापुढील कुणीही ही कार चालवू शकणार आहे आणि त्यासाठी लायसन्सची गरज नाही. कारण ही कार क्वाड्रीसायकल कॅटेगरीतील असून अनेक देशात त्यासाठी लायसन्सची गरज नाही.

बॉक्सी डिझाईनच्या या कारचे दरवाजे वेगवेगळ्या बाजूला उघडतात. ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा मागच्या बाजूला उघडतो तर शेजारच्या बाजूचा दरवाजा कार समोर उघडतो. या कार लॉक अनलॉक साठी क्यू आर कोड सिस्टीम असून व्हॉइस कमांडची सुविधा आहे. या कारला सनरुफ दिले गेले आहे. कारची लिथियम आयन बॅटरी दोन तासात फुल चार्ज होते आणि एका चार्ज मध्ये ही कार १०० किमी अंतर जाऊ शकते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ४५ किमी.

Leave a Comment