विल स्मिथच्या अल्लादिनचा ट्रेलर रिलीज

alladdin
अल्लादिन आणि त्याच्या जीनच्या कथा तुम्ही कित्येकवेळा ऐकली असेलच. या जोडीने कॉमिक बुकपासून छोट्या पडद्यापर्यंत आपले कारनामे दाखवत आपले मनोरंजन केले आहे. आता हॉलीवूडकडून देखील आपल्या अल्लादिनची भेट भेटणार आहे.

गे रिची यांनी दिग्दर्शित केलेला अल्लादिन या वर्षी 24 मे रोजी भारतात रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे, ज्यात अल्लादिन तेच जादुई कारनामे आकर्षक पद्धतीन चित्रित करण्यात आले आहेत. तसे बघायला गेलात तर हॉलीवूडचा हा लो बजेट चित्रपट आहे, पण चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्सवर खुप काम करण्यात आले आहे. अल्लादिनमध्ये विल स्मिथ, मेना मसूड आणि नाओमी स्कॉट प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. लाइव्ह अॅक्शन फिल्म 1992 मध्ये बनवलेल्या अॅनिमेशन फिल्मचे रुपांतर आहे, परंतु या चित्रपटात अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत.

Leave a Comment