
पुणे : मोबाईलवर पाकिस्तानी सिरीअल बघत असताना पुण्यातील एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा चक्क अंगठाच कापला आहे. होर्डिंग्स लावण्याचे आरोपी आसिफ सत्तार हा काम करतो. स्वारगेट पोलिसांनी त्याला पत्नीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
पाकिस्तानी सिरीअल बघत असल्यामुळे नवऱ्याने कापला बायकोचा अंगठा
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवरा बायकोमध्ये सोमवारी सकाळी काही कारणाने वाद झाला होता. त्यानंतर महिलेने आपल्या मुलाला दुकानात दुध आणण्यासाठी पाठवले होते. पण महिलेला जेव्हा दुधाची पिशवी खराब असल्याचे कळाले तेव्हा ती आपल्या मुलाला दमदाटी करु लागली. या दरम्यान तिच्या पतीने त्यात हस्तक्षेप केला.
या संदर्भात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आसिफ जेव्हा घरी आला तेव्हा त्याने तिच्यासोबत भांडण केल्यानंतर ती रागात बेडरुममध्ये निघून गेली. मी बोलत नसल्याने आसिफ माझ्यासोबत बोलण्यासाठी बेडरुममध्ये आला. पण तेव्हा मी पाकिस्तानी मोबाईलवर सिरीअल बघत असतानाचा त्याला राग आला.
आसिफला वाटले की त्याच्याकडे पत्नी दुर्लक्ष करत आहे. ती मोबाईलवर सिरीअल बघण्याला अधिक महत्त्व देत असल्यामुळे त्याने रागात पत्नीवर हल्ला केला. ज्यामुळे पत्नीचा अंगठा हातापासून वेगळा झाला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण शेजारच्या लोकांनी धाव घेतली आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
