
निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्याच्या घडीला तब्बल तीन मोठ्या चित्रपटांवर काम करत असून संजय लीला भन्साळी १९५२मधील मीना कुमारी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. त्याचबरोबर अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान या रिमेकमध्ये एकत्र काम करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा देखील झळकणार असल्याचे वृत्त आहे.
या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार शाहरुख-सलमान?
संजय लीला भन्साळी यांनी ‘बैजनाथ’, ‘बैजू’ आणि ‘बैजू तानसेन’ अशी तीन नावे रजिस्टर केली असल्याचे आले आहे. अभिनेता सलमान खान आणि संजय लीला भन्साळी या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १९ वर्षानंतर एकत्र काम करणार असून हा चित्रपट २०२०मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ‘दिल दे दिया इन्शाअल्लाह’ आणि ‘प्यार हो गया इन्शाअल्लाह’ ही दोन चित्रपटांची नावे देखील दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’ (IMPPA)मध्ये रजिस्टर केल्याचे वृत्त आहे.
