निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका

election
मुंबई – निवडणुकीच्या कामातून दहावी व बारावीच्या शिक्षकांना वगळण्याचे आदेश निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी आहेत. लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणुकांचे काम बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शिक्षक संघटनांनी निवडणुकांच्या कामातून वगळले जावे अशी मागणी केली होती. दहावी आणि बारावीचे निकाल निवडणुकांच्या कामामुळे लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

शिक्षक संघटनांनी यासाठी प्रयत्न केले होते. याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, शिक्षण सचिव व बोर्डाला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जून पूर्वी बोर्डाचे निकाल लावण्यासाठी दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी केली होती.

याबाबत बोर्डानेही सकारात्मक प्रतिसाद देऊन शिक्षण सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती. निवडणूक आयोगाने हा दिलासा शिक्षक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे दिला आहे. दहावी, बारावीचा निकाल या निर्णयामुळे वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment