तुम्ही पाहिले आहे का ‘वेडिंगचा शिनेमा’तील नवे गाणे ?

wedding-cha-shinema
आपल्याकडील लग्नपत्रिकेत एक वाक्य आवर्जून वाचायला भेटते… ते म्हणजे आमच्या मामा/काकाच्या लग्नाला यायचे हां! पण आता त्यावर एक गाणे बनवण्यात आले आहे आणि हे गाणे तुम्हाला सलील कुलकर्णी दिग्दर्शित आगामी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सलील कुलकर्णी यांच्या या चित्रपटात सगळीच गाणी हटके आहेत.

याआधी या चित्रपटातील प्रपोज करताना मनातील भावना मांडणारे बोल पक्या.., आणि आता लग्नघरातील छोट्या मुलाची मनोवस्था मांडणार हे मामाच्या लग्नाला हे गाणे तेवढेच खास आहे. खुद्द सलील यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केले असून ते संदीप खरे यांनी लिहिले आहे. तर हे गाणे सलील यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी, आर्या आंबेकर आणि प्रसनजित कोसंबी यांनी गायले आहे. ते लग्नाची तयारी सुरू असताना चित्रित करण्यात आले आहे. त्याचा मूडही एकदम मस्त जमून आला आहे.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, अल्का कुबल, शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमधर, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे वेडिंगचा शिनेमा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित तुमच्या भेटीला येणा आहे.

Leave a Comment