निवडणूक लढविणार नाहीत प्रियांका गांधी

priynkg
कॉंग्रेसच्या महासचिवपदाची तसेच उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची सूत्रे प्रियांका गांधी याच्याकडे सोपविली गेली असली तरी २०१९ च्या आगामी निवडणुक रिंगणात त्या उतरणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचार रॅलीपासून ही त्या दूर राहणार आहेत. राहुल गांधी याच्यावरच कॉंग्रेस प्रचाराची सर्व जबाबदारी आहे. काही ठिकाणी प्रियांका राहुल याच्यासोबत असतील पण त्या भाषणे करणार नाहीत असेही सांगितले जात आहे.

ज्या उत्तरप्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी प्रियांका याच्यावर आहे तेथे सध्या कॉंग्रेसची उपस्थिती ना च्या बरोबर आहे. त्यामुळे या महत्वाच्या राज्यात कॉंग्रेस अधिक मजबूत बनविण्यावर प्रियांका यांच्या भर राहणार आहे. प्रियांका यांची महासचिव पदावर निवड झाल्यावर लखनौ मध्ये झालेल्या रोड शो मध्येही प्रियांका यांनी भाषण केले नव्हते. त्यांनी पडद्यामागे राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे असेही सांगितले जात आहे. प्रियांका यांना भोपाल मधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात होती मात्र त्या निवडणूक लढविणारच नसल्याने ही मागणी विचारात घेतली गेलेली नाही. जानेवारी मध्ये प्रियांका राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.

Leave a Comment