
१९ व्या शतकात लंडनच्या कॉर्नवॉल भागात उंच डोंगरावर आणि अतिशय निसर्गरम्य परिसरात बांधलेला एक चिमुकला किल्ला सध्या सुंदर रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून खूपच लोकप्रिय ठरला असून या किल्ल्याचे अठरा महिन्यांचे बुकिंग आत्ताच फुल झाले आहे. विशेष म्हणजे त्या काळात हा किल्ला दारू पिणे, बेकायदा कामे करणे यासाठी लोक्वस्तीपासून दूर एकांतात बांधला गेला होता. डॉयडेन कॅसल असे त्याचे नाव आहे.
या चिमुकल्या रोमँटिक किल्ल्याचे दीड वर्षाचे बुकिंग फुल

या किल्लात आजही फोन नाही. वायफाय नाही. नॅशनल ट्रस्टने तो १९५६ मध्ये खरेदी केला होता. चाळीस एकर परिसरात हा किल्ला आहे. हा परिसर अतिशय रमणीय आहे. मात्र त्या काळात तेथे वीज नव्हती. स्वच्छतागृहाची सोय नव्हती. त्यामुळे स्थानिक लोक त्याचा वापर बेकायदा कामासाठी करत होते. विकला गेल्यावर मात्र या किल्ल्यात अनेक बदल केले गेले आणि आता तो सुंदर एकांतस्थळ म्हणून लोकप्रिय ठरला आहे.

प्रेमी युगुलांसाठी ही अतिशय योग्य जागा आहे. कारण येथे दोन लोकच राहू शकतात. एका रात्रीसाठी ४३ हजार रुपये भाडे आकारले जाते. एक आठवडा राहायचे असेल तर दीड लाख रुपये मोजावे लागतात. जुलै २०२० पर्यंत या किल्ल्याचे बुकिंग फुल झाले आहे. या बुकिंग मधून जो पैसा मिळतो त्याचा वापर किल्ला अधिक सुंदर बनविण्यासाठी केला जातो. अनेक चित्रपट आणि टीव्ही शोचे शुटींग येथे झाले आहे. या ठिकाणी किचन, घरगुती गरजेचे समान, फ्रीज, टीव्ही, वाशिंग मशीन अश्या सुविधा पुरविल्या जातात.
