विराट, गौतम, सेहवागच्या सत्काराची रक्कम शहीद फंडाला

satkar
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसीएशन ने विराट, सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ खर्च केली जाणारी १० लाखची रक्कम दिल्ली पोलीस शहीद फंडासाठी दिली जाणार असल्याचे घोषित केले आहे. या सामन्याची ९० टक्के तिकिटे विकली गेली आहेत. राज्यातील माजी आणि आजी आंतरराष्ट्रीय खेळाडूना या सामन्याचे व्हीआयपी पास दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजे १३ मार्च रोजी ऑस्टेलिया आणि भारत याच्यात ५ वा वन डे सामना दिल्लीत होत आहे. या सामन्याअगोदर टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली, माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर याचा सन्मान दिल्ली व जिल्हा क्रिकेट असो. म्हणजे डीडीसीए कडून केला जाणार होता. त्यासाठी १० लाख रुपये खर्च होणार होते. मात्र बीसीसीआयने आयपीएलचा उदघाटन सोहळा रद्द करून ती रक्कम पुलवामा शहीद फंडासाठी देण्याचा निर्णय जाहीर केल्यावर डीडीसीआयने त्याच्याच पावलावर पाउल टाकून या क्रिकेटपटूचा सन्मान रद्द करून शहीद फंडासाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला असे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment