रिंक राजगुरुच्या कागरचे नवे पोस्टर रिलीज

rinku-rajguru
सैराट चित्रपटाद्वारे महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रेक्षकांना आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिने याड लावलं होते. ती आता पुन्हा एकदा तिच्या नव्या चित्रपटाद्वारे तुमच्या भेटीला येत आहे. नुकतेच रिंकू राजगुरुच्या ‘कागर’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘पुन्हा एकदा मानाने झळकायला, ती येतेय तुमची मनं जिंकायला’, अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे.


आता एका नव्या रुपात ‘कागर’ चित्रपटात रिंकू दिसणार आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन याचे पोस्टर शेअर केले. हा चित्रपट ‘व्हॅलेंटाइन डे’ रोजी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 ला प्रदर्शित होणार होता. मात्र, रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Comment