तुम्ही पाहिला आहे का ‘कलंक’चा दमदार टीजर

kalank
बी-टाऊन गेल्या बऱ्याच दिवसांपासून करण जोहरच्या कलंक या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. या चित्रपटाबद्दल प्रेक्षक देखील फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत होते. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक या टीजरमध्ये पाहायला मिळते.

बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट ‘कलंक’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर रिलीज होताच एका तासाच्या आत या टीजरवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. माधुरी दिक्षितच्या नृत्याची झलक या टीजरच्या सुरुवातीलाच पाहायला मिळते. या नृत्याचे दिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे.

आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि वरूण धवन यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटात पाहायला मिळायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मनने अभिषेक वर्मनने केले आहे. चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment