का निघत नाही निवडणुकी दरम्यान बोटाला लावलेली शाई?

ink
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवार लोकसभा निवडणुकीचा घोषणा केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची एकच लगबग सुरु झाली आहे. त्यातच निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुका व्हिव्हिपॅट मशीनद्वारे घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण आज आम्ही तुम्हाला निवडणुकी संदर्भात एक महत्वाची माहिती देणार आहोत. जी या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावते ती म्हणजे मतदानादरम्यान आपल्या बोटाला लावली जाणारी शाई. आपल्या बोटाला ही शाई बोगस मतदान होऊ नये म्हणून लावण्यात येते. पण ही शाई एवढी पक्की असते की काही केल्या जात नाही.
ink1
ज्यावेळी देशात पहिल्यांदा मतदान झाले त्यावेळी खूप प्रमाणात बोगस मतदान झाले होते. म्हणूनच मतदानाच्या वेळी बोटाला लावण्यात आलेल्या शाईचा शोध लागला. नागरिकाला मत देण्याआधी बोटाला ही शाई लावून घ्यावी लागते. ती नखापर्यंत लावली जाते. पण या शाईचा रंजक इतिहास आहे. पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना या शाईची संकल्पना सुचली. त्याआधी बोटाला डाय लावला जायचा. नंतर कायमस्वरूपी शाईचा शोध लागला.
ink2
1962मध्ये पहिल्यांदा या शाईचा वापर केला गेला. 15 दिवसांनी ही शाई फिकट व्हायला लागते. ही बोटावर तीन महिने दिसते. ही शाई कुठेही लावली जात नाही. ती नख आणि त्वचा यावर लावली जाते. म्हणून ती लवकर जात नाही. निवडणुकीची शाई वांगी रंगाची असते. ही अनेक देशांत वापरली जाते.
ink3
ही शाई Mysore Paints & Varnish Ltd (MVPL) येथून पुरवली जाते. शिवाय ती कॅनडा, कंबोडिया, मालदीव, नेपाळ, साउथ अाफ्रिका आणि टर्की याही देशात पाठवली जाते. झिंब्वाबेमध्ये 2008साली राष्ट्रपती निवडणुकीला ज्या व्यक्तींच्या बोटावर ही शाई नव्हती, त्यांना मारपिट करण्यात आली होती. फक्त निवडणुकीच्या वेळीच ही शाई वापरली जाते. ती लिहिण्यासाठी वापरली जात नाही. तिच्यात सिल्वर नाइट्रेट तत्त्व असते. ती त्वचेवर पक्की बसते.

Leave a Comment