धोनी विना विराट असमर्थ – बेदी

bishan-singh-bedi
मुंबई – महेंद्रसिंह धोनी संघाचे अर्धे कर्णधारपद सांभाळतो, कोहली त्याच्याशिवाय चौथ्या एकदिवसीय सामन्यात असमर्थ वाटत असल्याचे भारतीय संघाचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदी यांनी म्हटले आहे. चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यातून धोनीला आराम देण्यात आला आहे. ऋषभ पंत त्याच्याजागी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.

बिशन सिंह बेदी पुढे म्हणाले, याबाबतीत प्रतिक्रिया देणारा मी कोण?, पण धोनीला आराम दिल्यामुळे आम्ही सर्वच हैराण होतो. यष्टीरक्षणात, फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात चौथ्या एकदिवसीय सामन्यात धोनीची उणीव भासली. एकप्रकारे धोनी संघाचा अर्धा कर्णधार आहे. सध्या धोनी युवा खेळाडू नाही. तो पूर्वीसारखा चपळ राहिला नाही. पण त्याची संघाला गरज आहे. संघ त्याच्या उपस्थितीत शांतपणे खेळतो. त्याची गरज कर्णधारालाही वाटते, त्याच्याशिवाय कर्णधार असमर्थ दिसून येतो.

बेदी विश्वचषक स्पर्धेआधी करण्यात आलेल्या प्रयोगाविषयी बोलताना म्हणाले, वैयक्तिक स्तरावर वर्तमान काळात जगायला मला आवडते. विश्वचषकाला अद्याप अडीच महिने शिल्लक आहेत. आपला नैसर्गिक खेळ संघाने केला पाहिजे. आपण गेल्या दीड वर्षापासून विश्वचषकासाठी तयारी करत आहोत. मी यावर अजिबात आनंदी नाही.

Leave a Comment