मुस्लिम बापाचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो ? अनंतकुमार यांचे वादग्रस्त वक्तव्य

anant-kumar
बंगळुरू – पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या डिएनएवरुन केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वडील मुस्लीम आणि ख्रिश्चन आई असलेल्या राहुल यांच्याकडे आपण हिंदू असल्याचा काही दाखला आहे का? असे हेगडे यांनी म्हटले आहे. हिंदू असल्याचा दाखला स्वत:ला जानवेधारी हिंदू म्हणवून घेणाऱ्या राहुल यांच्याकडे आहे का, असे हेगडे यांनी म्हटले आहे. हेगडे यांनी हे वक्तव्य कर्नाटकमधील सिरसी येथे आयोजित एका कार्यक्रमात केले आहे.

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत देशासह संपूर्ण जगाला माहित आहे. तरी देखील त्यावर राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील लोक प्रश्न उपस्थित करत असल्याचेही हेगडे म्हणाले. राजीव गांधी जेव्हा मरण पावले तेव्हा तेथे त्यांच्या शरीराचा काही भाग होता. या शरीराच्या भागाची डीएनए चाचणी करण्यात आली. यावेळी प्रियंका गांधीचे सॅम्पल घ्या पण राहुलचे नको, असे सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. हे सर्व ‘ऑन रेकॉर्ड’ आहे. तर हे हायब्रिड व्यक्तिमत्त्व पुरावा मागत आहे. अशाप्रकारचे लोक काँग्रेसमध्ये असताना लोक यांना जिंकून देण्याचा प्रश्नच उभा राहत नसल्याचेही, हेगडे म्हणाले. त्याचबरोबर पुन्हा एकदा केंद्रात भाजपच सत्ता स्थापन करेल असा दावाही हेगडे यांनी केला.

Leave a Comment